सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 245 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. आज एक हजार 110 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 865 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 245 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पुन्हा एकदा आठ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आठमध्ये मंगळवेढ्यातील एका तीस वर्षीय पुरुषाचा तर बार्शीत 36 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपुरातील झेंडे गल्ली येथील 70 वर्षीय महिला, भोसे येथील 50 वर्षीय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील 68 वर्षाचे पुरुष, हत्तरसंग येथील 65 वर्षाची महिला, बार्शी तालुक्यातील कव्हे येथील 36 वर्षाचे पुरुष, घारी येथील 55 वर्षाचे पुरुष, अनगर (ता. मोहोळ) येथील 72 वर्षाची पुरुष तर चांभार गल्ली मंगळवेढ्यातील 30 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या आता नऊ हजार 456 एवढी झाली आहे. अद्यापही 133 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही दोन हजार 553 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. सहा हजार 667 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.