पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.
‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन साठी मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दिनांक ४ सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात आता वाढ झाली असून विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दिनांक ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दिनांक ८ ते १० सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर १० सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. दिनांक २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
* डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र.९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.