रायगड : महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली. येथे 5 मजली इमारत काल सोमवारी रात्री जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 18 जणांना बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू, तर 18 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती एएनआयने दिली आहे. महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दाखल होऊन पाहणीही केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 7 जणांना बाहेर काढण्यात आलं होतं. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होता. मात्र, यापैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला. एनडीआरएफचं पथक दाखल झाल्यानंतर 10 जणांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आलं. मात्र, यापैकी नऊ जण मृतावस्थेत सापडले. तर एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. बचाव कार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.
* दहा जणांचा मृत्यू :
1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.
2) नविद झमाने, वय 35 वर्ष
3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष
4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष
5) अनाेळखी स्री चा मृतदेह
6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष
7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष
8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष
9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष
10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष