सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मंगळवारी आणिखी 311 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 283 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 हजार पार झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीणमध्ये चार हजाराने अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज मंगळवारी ग्रामीणमधील 1 हजार 213 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
* ‘या’ भागात आठ बळी
लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील 45 वर्षाची पुरुष, हिवरगाव (ता. मंगळवेढा) येथील 50 वर्षाची महिला, देशमुख प्लॉट बार्शी येथील 56 वर्षांचे पुरुष, राळेरास (ता. बार्शी) येथील 55 वर्षाचे पुरुष, तांदुळवाडी (ता. माढा) येथील 61 वर्षाची महिला, कुंभेज (ता. माढा) येथील 85 वर्षांचे पुरुष कण्हेर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष तर राशिन पेठ करमाळा येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.