सांगली : कोरोना परिस्थिती फार गंभीर झाली आहे. प्रशासनाने दोन दिवसात कामकाज सुधारले नाही, तर उपचाराअभावी मरण पावलेला मृतदेह सोबत घेऊन ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यात लोकप्रतिनिधी काम करत आहेत. मात्र, प्रशासन कसलाही मेळ लागून देत नसल्याचा गंभीर आरोप खासदार संजय पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना दिवसभर फिरून बेड मिळत नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परिणामी लोक मरायला लागले आहेत. प्रशासनाला सांगली जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी यश आलेले नाही. प्रशासन अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधी काम करायला तयार आहेत. मात्र, प्रशासनाची साथ मिळत नाही, असे पाटील म्हणाले.
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या परिस्थितीत प्रशासनाने योग्य ती पावले उचलायला हवीत. गावोगावी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आणि ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीच्या टप्प्यात उपचार व्हायला हवा. जेणेकरुन सांगली मिरजेच्या दवाखान्यावर जो ताण पडतो तो कमी होण्यास मदत होईल. सरकारकडे असलेली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरली तर आपण कोरोनावर मात करू शकू, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला.