सांगली : एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी मोठी मदत करेन असे सांगत बंगल्यावर घेऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यावर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित 28 वर्षीय मुलीने कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कडेगावचे पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस या अधिकाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणी 26 वर्षीय असून या तरुणीला स्पर्धा परीक्षेत मदतीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तिची तक्रार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सांगली पोलीस दलाला काळीमा फासणारी सदरची घटना असून, या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात फार मोठी खळबळ माजली आहे. या अधिकाऱ्याने आपल्या बंगल्यावर आणून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
* पीआयनेच दिली आत्महत्येची धमकी
बलात्कार बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करेन असे धमकीही पोलिस निरीक्षक हसबनिस यांनी दिली. याबाबत पीडित मुलीने कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला कलंक लावणाऱ्या या अधिकाऱ्यावर चौफेर टीका होत आहेत कडेगाव पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे.