नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला ७० वा वाढदिवस आहे. भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहा दरम्यान पक्षाकडून देशभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून प्रार्थना देखील करणार आहेत. मोदी सरकारच्या कारकीर्दीसह कामगिरीवर प्रकाश टाकणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्न-फळ वाटप कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गतवर्षी देखील पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आठवडाभराचा कार्यक्रमांची सुरुवात केली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मास्क वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांनामुळे नागरिकांना नक्कीच फायदा होईल. तसेच स्वतःसह इतरांच्या सुरक्षेचा संदेशही लोकांपर्यंत पोहचेल, अशी भावना भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
* गतवर्षीचा सेवा सप्ताह
भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना पंतप्रधानांचा वाढदिवस व्यापक पातळीवर साजरा करण्यासह विविध कार्यक्रम,उपक्रम राबवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षी सेवा सप्ताह दरम्यान रक्तदान शिबीर, फळ वाटप, स्वच्छता अभियान, जल संधारण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकदा वापरात येणा-या प्लॅस्टिक वापरापासून देशवासियांना परावृत्त करण्यासाठी संपूर्ण देशात अभियान राबवण्यात आले होते.