सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारच्या अहवालानुसार 109 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालात सुदैवाने मृत्यूची नोंद नाही तर 44 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 44 रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 588 झाली आहे. थोडक्यात शहरात निगेटिव्हचे प्रमाण वाढले आहे.
आजच्या अहवालात एका रूग्णांचा मृत्यू झाला नाही आता पर्यंत 412 रूग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 588 झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 852 तर 2 हजार 736 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 412 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 276 तर महिला 136 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 1 हजार 87 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 43 अहवाल निगेटिव्ह तर 44 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 63 हजार 576 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 56 हजार 971 अहवाल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 797 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 379 आहे.