सोलापूर : कोंचीकोरवी गल्लीतील टाकलेल्या मटका धाड प्रकरणातील प्रमुख आरोपी सुनील कामाठीची पत्नी आणि भावजय पोलिसांच्या तपासकामात सहकार्य करत नसल्याचे दिसून आले आहे.
मंगळवारी त्यांना दुसर्यांचा चौकशीला बोलावले होते. मात्र त्या गैरहजर राहिल्या. दरम्यान, पोलिस त्यांच्या घरी गेले असता घराला कुलूप असल्याचे आढळून आले. सोमवारी सुनीलची पत्नीची आणि भागिदार त्याचा पुतण्या आकाश याच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशीही त्यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्या दोघेही गैरहजर राहिल्या. त्यांच्या घरालाही कुलूप आढळून आले. दरम्यान, गुरूवारी त्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांनी तपासात सहकार्य न केल्यास त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
* चौघे न्यायालयीन कोठडीत
आकाश कामाठीसह चौघांची पोलिस कोठडीची मुदत आज बुधवारी संपली. त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, यातील प्रमुख आरोपी नगरसेवक सुनील कामाठी याला शोधण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ते विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त अभय डोंगरे यांनी सांगितले.