नवी दिल्ली : राजकारणामध्ये सक्रीय झालेली भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच तिने ट्वीटरवर राजीव गांधींचेच नाव का दिले, असा सवालही उपस्थित केला आहे.
बबिताने सोशल मिडियावरुन ही मागणी केली असून खेळांशी संबंधित पुरस्कारांना केवळ महान आणि सन्माननिय खेळाडूंचे नाव देण्यात यावे असं म्हटलं आहे. देशातील खेळ पुरस्कार राजकीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येऊ नयेत असं बबिताने म्हटलं आहे.
बबिताने ट्विटवरुन या पुरस्कारांचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच ही मागणी योग्य आहे की नाही यासंदर्भात तिने आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्या पुरस्काराला एखाद्या खेळाडूचे नाव देण्याचा सल्ला तुम्हाला कसा वाटला, असं बबिताने चाहत्यांना विचारलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इतकचं नाही तर बबिताने देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने का देण्यात येतात असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट अगदी खोचक शब्दात केलं आहे. “भारतात उभं राहून राजीव गांधी यांनी थेट इटलीमध्ये भाला फेकला होता म्हणून त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का?,” असा टोला अन्य एका ट्विटमध्ये बबिताने लागावला आहे.