सोलापूर : माजी नगरसेविका आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय महमंत्री पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. सोनिया रावत (नवी दिल्ली) यांनी नुकतेच रोहिणी तडवळकर यांना नियुक्तीचे पत्र पाठविले आहे. तडवळकर यांच्याकडे काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यांचा समावेश असलेल्या उत्तर झोनची संघटनात्मक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहिणी तडवळकर या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काम करीत असताना त्यांनी त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सोलापूरला व्हावे यासाठी झालेले आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल होता. तसेच अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सोलापूर महापालिकेत त्यांनी चारवेळा प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ साली त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कणखरपणे बजावली होती.