मुंबई : चालू महिन्यातील सप्टेंबरमध्ये देखील केंद्र सरकारकडून मिळणारी गॅस सबसिडी देण्यात येणार नाही आहे. गेल्या 4 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये गॅसचे पैसे आले नाही आहेत. सरकारने गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी मे महिन्यापासून रद्द करण्यात आली आहे. असा निर्णय का घेण्यात आला असावा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे मे महिन्यात घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य 162.50 रुपयांनी कमी करून 581.50 रुपये करण्यात आले. ज्यानंतर सबसिडी आणि बिना सबसिडीच्या सिलेंडरची किंमत सारखीच झाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीनुसार, केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मे, जून आणि जुलै मध्य गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले नाहीत.
* यामुळे सबसिडी बंद
गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य तसंच सबसिडी नसणाऱ्या सिलेंडरची किंमत देखील कमी झाली आहे. तर सबसिडी असणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशावेळी दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमतीतील अंतर जवळपास संपले आहे. त्यामुळेच सरकारन आता घरगुती गॅसवर सबसिडी देणे बंद केले आहे.
* सबसिडी रद्द केल्याचा परिणाम
घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये गेल्या वर्षभरापासून कपात केली जात आहे. या दरम्यान सबसिडी असणारा सिलेंडर साधारण 100 रुपयांनी महागला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात 14.2 किलो्ग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य 637 रुपये होते, जे यावर्षी 594 रुपये झाले आहे. जर अधिक सिलेंडर हवे असतील तर बाजार मुल्य देऊन खरेदी करावे लागतील.