नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हे खातं त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यावर तब्बल 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकरने खातं हॅक केल्यानंतर चक्क बिटकॉईनची मागणी केली.
यासंबंधी एक ट्विटही करण्यात आलं होतं. हॅकर्सनी ट्वीट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी द्या, असं लिहिलं गेलं होतं. पण त्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, ‘कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो’.
पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटच्या ट्विटर अकाउंटवर, मी तुम्हाला आवाहन करतो की कोविड १९ साठी स्थापन केलेल्या पीएम मोदी रिलीफ फंडसाठी डोनेट करा, असा मेसेज पोस्ट केला होता.
आणखी एका ट्विटमध्ये हॅकरनं लिहिले होतं की, हे अकाउंट जॉन विक (hckindia@tutanota.com) ने हॅक केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेलं नाही. दरम्यान, लगेच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटच्या ट्विटर अकाउंटवर 25 लाखांहून फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, ट्विटरनं गुरुवारी या घटनेला पुष्टी देत म्हटलं आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं अकाउंट अनेक ट्विट करुन हॅक करण्यात आलं. पंतप्रधान मोदींचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. या घटनेची आम्ही सक्रियरित्या चौकशी करत आहोत.