सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. गेल्या मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात दीड हजार नव्याने बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दुर्देवाने 50 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी 768 आणि बुधवारी 735 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. दोन दिवसांत नवीन 1 हजार 503 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. या दोन दिवसांत जिल्ह्यातील 47 आणि परजिल्ह्यातील 3 अशा एकूण 50 व्यक्तींचा मृत्यू झाला. दोन दिवसांत 571 व्यक्ती कोरानामुक्त झाल्या. उपचाराखालील 616 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यात बुधवारअखेर एकूण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 13 हजार 897 झाली आहे. बुधवारअखेर 7 हजार 927 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या 5 हजार 428 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 616 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
त्यातील 510 व्यक्ती ऑक्सिजनवर, 81 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 20 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, 5 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारअखेर एकूण 542 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
सांगली महापालिका क्षेत्रात मंगळवारी 264 आणि बुधवारी 333 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. दोन दिवसात 597 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. दोन दिवसात सांगलीतील 340 आणि मिरजेतील 257 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.
* या ठिकाणचे 50 मृत्यू
तासगाव येथील 6, अंजनी 3, बोरगाव 3, जरंडी 3, कवठेएकंद 4, खुजगाव 3, कुमठे 7, मणेराजुरी 3, मांजर्डे 6, मतकुणकी 1, मोराळे 1, नागाव 1, वासुंबे येथील 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. आटपाडी 17, उंबरगाव 3, पिंपरी बु्र. 4, बेरमळवाडी 1, शेटफळे 2, निंबवडे 1, दिघंची 2 आणि तडवळे येथील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आली. विटा येथील 23, भाळवणी 4, पंचलिंगनगर 1, गार्डी 1 आणि वेजेगाव येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. इस्लामूपर येथील 28, चिकुर्डे 1, केदारवाडी 1, रेठरेहरणाक्ष 1, बहे 1, शिरटे 1, आष्टा 5, काळमवाडी 1, कासेगाव 2, घबकवाडी 1, बागणी 1, फारणेवाडी 1, ढवळी 1, फाळकेवाडी 2, बागणी 1, वाळवा 5, बोरगाव 8, ताकारी 1, तांबवे 1, पेठ 2, जांभूळवाडी 1, नवेखेड येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. कवठेमहांकाळ येथील 12, शेळकेवाडी 7, रांजणी 6, रामपूरवाडी 3, धुळगाव 2, कुकटोळी 2, खरशिंग 2, विठुरायाचीवाडी 2, कुची 1, ढालगाव 1, लोणारवाडी येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. जत 6, शेगाव 1, वाळेखिंडी 1, बिळूर 2 आणि कोळगिरी येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. शिराळा तालुक्यात जांभळेवाडी 5, देववाडी 2, कांदे 9, मांगले 1, चरण 5, भेडसगाव, शिरसी, वाकुर्डे बु., चिखली, नोटोली, बिऊर, नवेखेड, भाटवाडी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. पलूस येथील 24, अमरापूर 15, अंकलखोप 7, बुर्ली 2 आणि ब्रह्मनाळ येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.