नवी दिल्ली : देशभरात १३ सप्टेंबरपासून NEET परीक्षा सुरु होणार आहे. त्या धर्तीवर परिक्षार्थांना केंद्र सरकारच्या गाइडलाइनबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंताही अखेर दूर झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रिम कोर्टानं परीक्षा घेण्यात याव्यात, असा आदेश दिला. त्यामुळे देशभरात जेईईनंतर आता नीट परीक्षा होणार आहेत.
कोरोना विषाणूमुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरुन ३,८४३ करण्यात आली आहे. NEET परिक्षासाठी जारी करण्यात आलेल्या
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गाइडलाइननुसार, परिक्षा केंद्रात विद्यार्थी गेल्यानंतर परिक्षा हॉलपर्यंत जाताना प्रत्येक विद्यार्थांमध्ये सहा फूटाचं अंतर अनिवार्य आहे. परिक्षा केंद्रावर मास्क घालूनच प्रवेश करावा. शिवाय.. साबाणाने हात धुवावेत अन् सॅनिटाझरचा वापर करावा.
दरम्यान, १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मुंबई महानगरात ‘नीट’ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच (हॉल तिकीट) रेल्वेप्रवासाची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.