मुंबई : भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं ट्विट केले आहे.
राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रनौत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
कंगनाच्या कोणत्याही ट्विटमध्ये असं कुठेचं वाटलं नाही, की ती देशद्रोही आहे किवा तीने कोणत्याही व्यक्तीला धमकावलं आहे, असं मतं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्यांची ‘महिलांनी तोंड बंद ठेवाव’ ही विचारधारा समोर येते. राष्ट्रीय महिला आयोगाने ही भूमिका कंगना अभिनेत्री आहे म्हणून घेतलेली नाही. उद्या जर कोणालाही अशी धमकी आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची हीच भूमिका घेईल, असं रेखा शर्मा म्हणाल्या आहेत. शिवसेना नेते सरनाईक यांच्या अटकेची मागणीही केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’ असल्याचं ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलं आहे ते पाहू. “मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.”