मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात काही दिवसांपासून चांगलाच वाद सुरु आहे. त्यातच आता कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. कंगनाने केलेल्या टीकेनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर कंगना प्रकरणी काहीही बोलायचं नाही, असा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणं सोडून दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी कडवट टीका कंगना रनौतने केली होती. त्यापूर्वी कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली.
या चर्चेत कंगनासह अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर “कंगना प्रकरणी काहीही बोलायचं नाही, असा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतेय, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो,”
संजय राऊत – शिवसेना नेते