बार्शी : प्रेमविवाह केलेल्या तरुणाने राहत्या घरी नैराश्यामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. विनायक पुरुषोत्तम वरळे (वय 39 ) असे या तरुणाचे नाव असून ते येथील पाटील प्लॉटमध्ये जाधव यांच्या जागेत भाडेकरु म्हणून रहावयास होते. लॉकडाऊनच्या काळात ते सांगली वरुन बार्शी येथे रहावयास आले होते.
मूळचे बार्शीचे असलेले विनायक यांचे वडील पुरुषोत्तम वरळे हे नोकरीनिमित्त दीर्घकाळ सांगली येथे वास्तव्यास होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बार्शी येथे रहावयास आले. ते सध्या येथे जाधव यांच्या जागेत होते. विनायक याने प्रेमविवाह केला होता. त्याची पत्नी डेंटिस्ट असून त्यांचा सांगली येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विनायक गेली अनेक वर्षे नोकरी-व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यास सतत अपयश येत होते. त्यामुळे तो नैराश्यामध्ये होता. त्यातच घरगुती वादामुळे तो एकाकीच झाला होता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तो बार्शी येथे रहावयास आला असला तरी कोणामध्ये मिसळत नव्हता. आई-वडिल काही निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर घरी एकटाच असलेल्या विनायकने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.