मुंबई : दिवसेंदिवस देशातील कोरोना व्हायरसचा कहर वाढतच आहे. कोरोनाची हजारो प्रकरणे रोज समोर येत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या विषाणूला बळी पडले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेता आफताब शिवदासनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
आफताब शिवदासनी याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यासह, त्याने कोरोनाच्या लक्षणांबद्दल देखील सांगितले आहे. आफताब शिवदासानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात तो म्हणतो, ‘सर्वांना माझे नमस्कार, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण तंदुरुस्त आणि फिट असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल.’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘अलीकडेच मला ड्राय कफ आणि सौम्य ताप अशी लक्षणे दिसली. त्यानंतर मी माझी कोरोना विषाणूची चाचणी केली असता दुर्दैवाने ती सकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. यानंतर, डॉक्टर आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली मला घरी अलग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’
त्याने पुढे लिहिले आहे- ‘गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो की, त्यांनी त्यांच्याही कोरोना विषाणूच्या चाचण्या करून घ्या म्हणजे ते सुरक्षित राहू शकतील. आपल्या प्रार्थना आणि पाठींब्यामुळे मी लवकरच बरा होऊन माझे जनजीवन सुरु करेन. सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरणे सुरू ठेवा, यामुळे आपले प्राण वाचू शकतात. आपण सर्वजण मिळून ही लढाई जिंकू.’