सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोनावर मात केली आहे. मात केल्यावर त्यांनी आपल्या भागातील अनेक कामांचा शुभारंभ केला. यावेळी कोरोना संबंधित त्यांनी एक आवाहन केलं आहे. कंगनाच्या विषयावर सवाल उपस्थित करता त्यांनी त्या विषयास बेदखल करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोनाला घाबरुन न जाता, कोरोनाच्या भीतीने घरात न थांबता काही लक्षण आढळली तर थेट रूग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी जनतेला केलं आहे.
कंगणाच्या प्रकरणावर बोलताना, मला तो विषय इतका महत्वाचा वाटत नाही. कारण सोलापुरात यापेक्षा अनेक जास्त महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे या विषयावर बोलणं किंवा टिपण्णी करणं मला उचित वाटत नसल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशात अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्या समोर येत आहेत. सोलापुरात देखील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून केंद्र सरकारने याबाबत पूर्व तयारी करणे महत्वाचं होतं, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.