अहमदाबाद : सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे देशभरात सर्वत्र कंगनाची जोरदार चर्चा सुरु आहे. कंगना – शिवसेनेत सुरु असलेल्या वादाचा गुजराती व्यापा-यांनी खूप हटक्या पद्धतीने फायदा करुन घेतला आहे. भावनिकतेतून त्याला चांगले यशही मिळतंय. वाचा सविस्तर.
गुजरातमधील सुरत येथील एका व्यापाऱ्याने कंगनाच्या फोटोचा वापर करुन एक प्रिंटेड साडी तयार केली आहे. या साडीवर “I Support Kangana Ranaut” असं लिहिलेलं आहे. सध्या या साडीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
कंगना आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादानंतर कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचे नुकसान झाले आहे. मात्र मुंबई हायकोर्टाकडून या कारवाईवर स्थगिती देण्यात आली. पण यादरम्यान देशभरातील प्रत्येक वर्गातून कंगनाच्या समर्थनात अनेक लोक आवाज उठवत आहेत.
कंगनाच्या समर्थनासाठीच सुरतमधील एका साडी व्यापाऱ्याने कंगनाचा मणिकर्णिका चित्रपटातील फोटोचा वापर करत एक आगळी वेगळी साडी तयार केली आहे. गुजरातच्या सुरत येथील रजत डावर यांनी ही साडी तयार केली आहे. रजत जावर यांनी साडीच्या पदरावर मणिकर्णिका चित्रपटातील फोटोचा वापर करत I Support Kangana Ranaut असं लिहिलेलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुजरातमधील आलिया फेब्रिक्स प्रीमिअम फॅन्सी फेब्रिक्ससाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या डिझायनरमध्ये हा व्यापारी लोकप्रिय आहे. आलिया फेब्रिक्सचा व्यापार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चैन्नईमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतेच बॉयकॉट चायना ही मोहिम सुरु होती, तेव्हा पण या व्यापाऱ्याने सहभाग घेत बॉयकॉट चायना नावाच्या साड्या तयार केल्या होत्या.
सुरतमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या साड्या तयार केल्या आहेत. सुरतमधील व्यापारी देशभरातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा आधार घेत साड्या छापतात. सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांचीही प्रिंटवाली साडी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. तसेच येथील कपडा बाजारात स्वच्छता मिशन, कोरोना जागृती अभियान इतर जनजागृती संदेशच्या साड्याही तयार केल्या होतात.
* काय म्हणत व्यापारी वाचा…
महाराष्ट्र सरकारने एका महिलेच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्या घरावर जी कारवाई केली ती अयोग्य आहे. त्यांना मुंबईत येऊ न देण्याची धमकी देणे. हे सर्व आम्हाला अयोग्य वाटत आहे. पण कंगनाने हिम्मत दाखवून एकटी प्रशासनासोबत लढली. त्यामुळे आम्ही प्रेरित झालो. त्यानंतर आम्ही कंगना रनौतला समर्थन देण्यासाठी I Support Kangana Ranaut असं लिहिलेली साडी प्रिंट करण्याचा विचार आला”, असं सुरतमधील व्यापाऱ्याने सांगितले.