सोलापूर : सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेतर्फे केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सीमावर्ती असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर अग्रेसर आहे.
सोलापूरात मराठी साहित्य, नाट्य, संगीत आणि विविध कला समृध्दीसाठी अनेकांचे योगदान आहे. या शहराने अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कलावंत महाराष्ट्राला दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीमावर्ती असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर अग्रेसर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये “मराठी भवन’ तसेच त्यातील एका विभागाला स्व. दत्ता हलसगीकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने केली होती. त्यानुसार दिवंगत वासुदेव रायते, हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, गुरू वठारे, रवी हलसगीकर यांनी आमदार प्रणिती शिंदेसह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मराठी भवनच्या मागणीचे निवेदन दिले होते.
गेल्या 7 ते 8 वर्षापासून झालेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरात मराठी भवन तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यानिमित्त साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, हास्यसम्राट दिपक देशपांडे, सहकार्यवाह गुरू वठारे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, अभय जोशी यांनी आमदार शिंदेचा पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त करीत सत्कार केला.
“मराठी भवन सोलापूरमध्ये व्हावे म्हणून मसाप दक्षिण सोलापूर शाखेकडून माझ्याकडे प्रस्ताव आला. मी सोलापूरची लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे माझे कर्तव्य आहे आणि सोलापूरकरांनी मला काम करण्यासाठीच निवडून दिले आहे. प्रस्ताव जुना होता. त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भवनसाठी निधी मंजूर करून आणला. माझ्या हातून हे काम होत आहे याचे मला समाधान आहे”
प्रणिती शिंदे – आमदार