नाशिक : अनलॉकच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्य विविध शहरांसाठी आज सोमवारपासून बसगाड्या सोडल्या आहेत.
यातील नागपूरसाठीची साधी शयन यान बससेवा सुरू केली झाली असून, या गाड्या नवीन सीबीएस बसस्थानकावरून सुटणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीच्या सूचनांप्रमाणे प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक व सोशल डिस्टन्सिंगसह अन्य विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही महामंडळातर्फे स्पष्ट केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सोमवारपासून नाशिकहून रात्री आठला नागपूरसाठी साधी शयन यान बससेवा सुरू होत आहे. मालेगावहून सव्वा दहाला, धुळ्याहून बाराला, जळगावहून रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी, भुसावळहून रात्री पावणेतीनला ही बस उपलब्ध होईल. तसेच नागपूरहून नाशिक परत ही बस रात्री आठला सोडली जाईल. या मार्गाशिवाय अन्य काही मार्गांवरदेखील बससेवा सुरू होणार आहे. यात नाशिक-सोलापूर मार्गावर सकाळी साडेनऊ व रात्री आठला बस उपलब्ध असेल.
नाशिक-अकोला मार्गासाठी सकाळी साडेआठला, नाशिक-लोणारकरिता सकाळी साडेसातला बस उपलब्ध असेल. नांदगाव-परळी वैजनाथकरिता सव्वानऊला गाडी सोडली जाणार आहे. नांदगाव-देऊळगाव राजाकरिता अकराला गाडी सोडली जाईल.