सोलापूर : गॅलेक्सी हॉटेल चालक अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात पाच सावकारांना जामीन मिळाल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदीपसिंह रजपूत यांनी दिली.
सावकार सोमप्पा सिद्दप्पा कोठारगस्ती, व्यंकटेश पप्पांना दंबलदिंडी, लक्ष्मण दशरथ जाधव,दशरथ मधुकर कसबे, खंडू सुरेश सलगरकर यांचा न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सरकारपक्षाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार केली जाणार आहे.
खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून गॅलेक्सी हॉटेल चालक अमोल जगताप यांनी आत्महत्या केले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी लक्ष्मण जाधव यांच्या विरोधात अकरा गुन्हे दाखल आहेत. जाधव याने अमोल जगताप यांना चार लाख रुपये ४ टक्के दराने दिले होते. व्यंकटेश दंबलदिंडी याने जगताप याला ७० लाख रुपये ३ टक्के दराने दिले होते.यानंतर सोमप्पा कोठारगस्ती याने सगळ्यात शेवटी येऊन सर्व सावकारांचे एकच सावकार व्हावा या उद्देशाने त्याने सर्व सावकारांचे देणे देऊन खासगी बँकेतून एक कोटी रुपयांचे कर्जाचे प्रकरण केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचबरोबर खंडू सलगरकर याने त्याचा साथीदार बिराजदार याच्या मदतीने जगताप यांना दोन लाख रुपये ३० टक्के व्याजाने दिले होते.
हे दोघे दर महिन्याला त्यांच्याकडून ६० हजार रुपये वसूल करत होते. सोबतच जगताप यांच्या नावावरची शेत जमीन आपल्या नावावर लिहुन घेतले होते.याच बरोबर या सर्व सावकारांनी पैशासाठी तगादा लावला होता.याबाबतचे सर्व कागदपत्रे सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात सादर केले होते. तरी न्यायालयाने आरोपींना जामीन दिल्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.