पंढरपूर : मागील दोन दिवसापासून पंढरपूर, सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कासाळ ओढ्याचे नदीत रुपांतर झालेचे चिञ सध्या पहावयास मिळत आहे. आज शुक्रवारी सायंकाळी देखील उपरी, भंडीशेगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी आले आहे.
पुलावर पाणी आल्याने पंढरपूर – सातारा व पंढरपूर फलटण, पंढरपूर – इंदापुर – पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाने बॅरेकेटिंग टाकून बंद केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके हे अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने ओढ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहेत. पो नि प्रशांत भस्मे हे उपरी, भंडीशेगाव याठिकाणी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.