मोहोळ : नरखेड येथे घडलेल्या प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना सोहाळे (ता. मोहोळ )येथील ही दुसऱ्या प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. आठवड्यात दोन अशा आत्महत्याच्या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र ज्ञानेश्वर रामचंद्र बचुटे (वय वर्ष 21, रा.सोहाळे ता.मोहोळ) व या गावात राहणारी आणि अवघ्या पंधरा दिवसापूर्वी लग्न होऊन सासरी गेलेली पूजा प्रवीण बचुटे पाटील (वय वर्ष 22 सध्या राहणार नागज फाटा ता.सांगोला) हे दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ असल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपणास समाज व नातेवाईक एकत्र येऊ देणार नाहीत, असे समजून दोघांनीही सोहाळे गावच्या शिवारातच माणिक महादेव बचुटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना रविवारी सकाळी उघड झाली. माणिक बचुटे हे आपल्या शेतामध्ये गेले असता यांच्या निदर्शनास ही घटना आली. याबाबत कामती पोलिस ठाण्यात करण्यात खबर देण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत
* लग्नानंतर येतीजातीसाठी आल्यावर केली आत्महत्या
हे दोघे एकाच गावात राहत असल्यामुळे व त्यांचा नियमित संपर्क असल्यामुळे त्यांची एकमेकाशी मने जुळली व यांच्याजवळ त्याचे प्रेमात रुपांतर झाले. आपल्या नात्याला विरोध होणार याची कल्पना असूनही प्रेमात नाहून निघाले. परंतु समाजालाही या गोष्टी मान्य होणे अवघडच असते आणि नेमकं तसंच झालं दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमाला विरोध होऊ लागला. ही घटना दोघांच्या घरी समजल्यानंतर समाजात नावे ठेवून घ्यावी लागतील, असे समजून ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ असे समजून लाख रुपये खर्च करून आई-वडिलांनी मुलीचा विवाह सांगोला तालुक्यातील पाटील यांच्याशी लावून दिला.
ही गोष्ट मुलीला मान्य नव्हती. परंतु आई-वडिल व नातेवाईक यांच्यासमोर तिचे काही न चालल्याने गप्पच राहिली. लग्न झाले सासर अनुभवून रिवाजाप्रमाणे येती- जातीसाठी पूजा माहेरी आली. पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
* आठवड्यात दोन घटना
नरखेड प्रेमीयुगुलाची आत्महत्या होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला नाही. काही दिवसापूर्वी झालेल्या घटनेत ते दोघेही एकमेकांचे मावस बहीण भाऊ होते. जवळपास तसाच दुसरा प्रकार सोहाळे गावांमध्ये घडला असून हे दोघेही चुलत बहीण भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.