नवी दिल्ली : ‘फिटनेस इंडिया’ अभियानाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराटसह देशभरातील नागरिकांना फिटनेससाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक दिग्गजांसोबत चर्चा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* तुमचं तर नाव आणि काम दोन्ही ‘विराट’
पंतप्रधान मोदी कोहलीला म्हणाले की, ‘तुमचं तर नाव आणि काम दोन्हीही विराट आहे. तसेच कोहलीला त्याच्या फिटनेस रूटिनबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याबाबत उत्तर देताना कोहली म्हणाला की, ‘फिट इंडिया मोहिमेचा फायदा सर्वांनाच होत आहे. खेळाची गरज फार वेगाने बदलत आहे आणि आपण त्यांना पूर्ण करू शकत नव्हतो. आपण त्या फिटनेसमुळे फार मागे पडलो होतो. त्यामुळे मला वाटतं की, फिटनेसचं प्राथमिकता असली पाहिजे. आज फिटनेस सेशन मिस झाल्यामुळे वाईट वाटतं. मैदानावर अनेक हालचाली आम्ही बघतो. तुम्ही प्रचंड चपळ आहात. तुम्ही एवढी धावपळ करतात. त्यामुळे तुम्ही कधी थकत नाहीत का?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विराट कोहलीला विचारला
* मिलिंद सोमणच्या वयावरुन गंमत
पंतप्रधान मोदींनी अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणच्या वयावरून गंमत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मिलिंद, मला तुम्हाला विचारायचं आहे की, तुमचं वय जे ऑनलाइन दाखवलं जातं, ते खरंच आहे का?’ यावर मिलिंद आणि मोदी दोघेही हसू लागले. त्यानंतर मिलिंदने सांगितलं की, ‘मला अनेक लोक विचारतात की, तुमचं वय खरचं 55 आहे का? पण जेव्हा मी माझ्या पूर्वजांना पाहतो, की ते 100 किलोमीटर चालत असते. ज्यामध्ये महिलाही 3 किमी सुरुवात करतात. मी खरचं फिट इंडिया मोहिमेचं कौतुक करतो.’
* नरेंद्र मोदींनी चारवेळा पाहिला ‘तो’ व्हिडीओ
मिलिंद सोमण म्हणाले की, आईचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती पुशअप करताना दिसून आली होती. यावर बोलताना मोदी म्हणाले की, ‘मी 4 वेळा तो व्हिडीओ पाहिला. त्यांना माझा विशेष प्रणाम आहे.’ मिलिंद यावर बोलताना म्हणाले की, ‘आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो. त्यांनी त्याचसोबत सांगितलं की, ते शूज न वापरताच धावतात.
* विराटला योयो टेस्टबाबत विचारला प्रश्न
क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूंसाठी एक योयो टेस्ट होत आहे. ही टेस्ट नेमकी असते तरी काय? या टेस्टपासून कॅप्टनला सूट असते का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला.
कर्णधाराला योयो टेस्टपासून सूट मिळते का? हा प्रश्न ऐकून विराटला हसू आले. त्याने हसतहसत पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं. “योयो टेस्ट ही प्रत्येक खेळाडूसाठी गरजेची आहे. जगातील इतर संघातील खेळाडूंची आपल्या संघाच्या खेळाडूंच्या फिटनेसशी तुलना केली तर आपल्या खेळाडूंची फिटनेस क्षमता अजूनही कमी आहे. खेळाडूंची ही क्षमता वाढावी, असा आमचा उद्देश आहे”, असं विराट कोहलीने सांगितलं.
टी-20 किंवा एकदिवसीय सामने एका दिवसात संपतात. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये सलग पाच दिवस मैदानावर खेळावं लागतं. त्यामुळेच योयो फिटनेस टेस्ट जरुरीची आहे. या फिटनेस टेस्टसाठी सर्वात आधी मीच धावतो. या टेस्टमध्ये मीदेखील नापास झालो तर माझीही अंतिम सामान्यात कदाचित निवड होणार नाही”, असं विराट कोहली म्हणाला.
फिटनेस टेस्टसारखी यंत्रणा अंमलात आणणं संघासाठी चांगलं आहे. कसोटी सामन्यांमध्ये दोन किंवा तीन दिवसांनंतर खेळाडूंना थकवा जाणवायला लागतो. आपल्या जलद गोलंदाजांचं जगभरात नाव आहे. त्यांना चांगल्या फिटनेसच्या जोरावर दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीदेखील चमकदार कामगिरी दाखवता येऊ शकते”, असं मत विराटने मांडलं.