श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक यांची आज गुरुवारी निवड करण्यात आली. दिवंगत चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडप्रक्रिया संपन्न झाली.
आज गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये प्राधिकृत अधिकारी एस. एम. तांदळे यांचे अध्यक्षतेखाली संचालक आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली.
यावेळी ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असून पांडुरंग परिवारातील सर्व संस्था चांगल्या चालू असून सर्व सभासद, कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून त्या भक्कमपणे उभ्या आहेत, असे सांगितले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी भावनाविवश होऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या संबंधी भावना व्यक्त करताना उपस्थितांचे मन हेलावून गेले व त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी बोलताना नवनियुक्त चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अत्यंत जड अंतकरणाने जबाबदारी स्विकारत असल्याचे भावूक होवून मोठे मालक ज्या पद्धतीने सहकारी संस्था सांभाळीत होते. त्याच पद्धतीने पांडुरंग परिवाराच्या सहकारी संस्था चांगल्या प्रकारे सांभाळू तसेच पांडुरंग परिवारातील सदस्यांना, सर्व सभासद शेतकऱ्यांना मोठ्या मालकांची उणीव भासू देणार नसल्याचे सांगितले.
यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी भावना व्यक्त करताना त्यांच्याकडून ज्याप्रमाणे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या पाठीमागे आपण आजपर्यंत खंबीरपणे उभे होतो त्याचप्रमाणे आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठीमागेही तसेच उभे राहू, कारखान्याची व पांडुरंग परिवारातील संस्थांची यापुढेही तशीच प्रगती करु, असा दृढ विश्वास व्यक्त केला.
यावेळी व्हा. चेअरमन वसंत देशमुख, दाजी पाटील, दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, बाळासाहेब यलमार, हरिषदादा गायकवाड, तानाजी वाघमोडे, नागन्नाथ शिंदे, दिनकर कवडे, सुरेश आगावणे, ज्ञानदेव ढोबळे, शिवाजी साळुंखे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, संगिता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधूताई पवार,अरुण घोलप, भिमराव फाटे, , कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.