मुंबई : भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकला आहे. यावेळी स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवण्यात आले होते. या छाप्यासाठी तब्बल 30 ते 35 पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इतक्या मोठा गदारोळ होत असल्याचे पाहून येथे मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते. मात्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन त्यांना पिटाळून लावले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा खंडणी विरोधी आणि नार्को टेस्टच्या अधिकाऱ्यानी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खालिद गुड्डू हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असून ते अगोदर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष होते. त्यानंतर सध्या ते एमआयएम मध्ये शहरराध्यक्ष असून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ते माजी नगरसेवक आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून काही निकाली निघाले आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्दतीने अटक केली होती.