नागपूर : शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवानाच्या पार्थिवाला त्यांच्या मुली मृणाल तसेच प्रज्ञा यांनी मुखाग्नी दिला.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी प्रमिला नरेश बडोले आप्त परिवार आणि सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील बडीपूरा येथे २४ सप्टेंबर २०२० रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद झालेल्या नरेश बडोले यांच्या निवासस्थानी जावून अंत्यदर्शन घेतले. बडोले यांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार असं सांगत कुटुंबाची सांत्वन केले. शहिद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.