सांगली : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करीत आज इस्लामपूर बाजार समितीत होळी केली. लडेंगे जितेंगे, शेतकरी एकजुटी चा विजय असो, अशा घोषणा देत इस्लामपूर येथे कृषी विधेयकची होळी करत निषेध व्यक्त केला.
डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत पारित केलेला कायदा शेतकऱ्यांना अनेक तोटे सहन करायला लावणारा असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या या धोरणामुळे लहान – लहान अडत व्यापारी व हमाल मालवाहतूक करणारे वाहनं चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.
केंद्र शासनाचे हे धोरण शेतकऱ्यांना भूमीहीन करणारे आहे. नवीन कृषी कायद्या विरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत महात्मा फुले यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या पुस्तकाचे जाहीर वाचन केले. शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देण्यात आला. सध्या कोविडसारख्या आजारामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना शेतीचे कायदे बदलणे योग्य नसल्याचेही सांगितले.
समाजातील कोणत्याही स्तरावरील व्यक्तीचा विचार केला जात नाही. शेतकरी जनता यांची मते विचारात न घेता जनविरोधी कायदे केले जात आहेत. ही मनमानी कुठे तरी थांबली पाहिजे असे मत कॉ. धनाजी गुरव यांनी व्यक्त केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कृषी विधेयक आणि केंद्र सरकारविरोधी घोषणा देत कृषी विधेयकाची होळी करण्यात. यावेळी कॉ. दीपक कोठावळे , कॉ. दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर, कामगार नेते अहमद मुंडे, मारुती रोकडे, ॲड. सभापती विश्वास पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील तसेच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,समिती आवारातील हमाल कामगार, अडते, दलाल, तोलाईदार, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.