नवी दिल्ली : जगावर असलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे यावर्षी संयुक्त राष्ट्रांची 75 वी महासभा ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पाकव्याप्त काश्मिर आणि काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गरळ ओकल्याचं पाहाला मिळालं.
UN महासभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भारताच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कब्जा केलेल्या पाकिस्ताननं तो रिकामा करावा, असंही यावेळी महासभेत भारताकडून सांगण्यात आलं. या महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलत असताना त्यांनी भारतावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान भारताचे प्रतिनिधी मिजितो विनितो यांनी महासभेतून वॉकआऊट करत विरोध दर्शवला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान द्वेष आणि हिंसाचार भडकवत आहेत. भारतावर खोटे आरोप करत आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यातून पाकिस्ताननं बाजूला व्हावं असंही भारताच्या प्रतिनिधीने भरमहासभेत पाकिस्तानला यावेळी सुनावलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाककडून अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न झाला. या मुद्द्यावरून भारताकडून पाकिस्तानला खडसावताना विनितो म्हणाले की, 2019 मध्ये अमेरिकेत सर्वांसमोर या नेत्यानं मान्य केलं होतं की देशात अजुनही 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. ज्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिलं आहे. अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरमध्ये लढत आहेत.
‘जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग आहे. उर्वरित वाद काश्मीरच्या त्या भागाशी आहे ज्यावर पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं कब्जा केला आहे. ईश निंदा या कायद्याचा गैरवापर करून मागच्या 70 वर्षांत केवळ अल्पसंख्याक असणाऱ्यांचा पाकिस्तानकडून अत्याचार करण्यात आले. त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं. दहशतवाद आणि कट्टरता, बेकायदेशीर व्यापार याखेरीच पाकिस्तानला गेल्या 70 वर्षात काहीच करता आलं नाही. दहशतवादाला पाठिंबा देणं पाकिस्तानला थांबवावं लागेल’, असंही विनितो यांनी यावेळी सांगितलं.