सोलापूर / पंढरपूर : खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक साळुंखे उपस्थित होते.
* दोन्ही छत्रपतींनी दबाव आणावा
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. अशातच उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. यावर शरद पवारांना विचारले असता, त्या दोन्ही छत्रपतींनी आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. सातारचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही खासदार भाजप पुरस्कृत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिफारशीनेच त्यांची राज्यसभेत निवड झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या दोन्ही छत्रपतींनी पुढाकारा घ्यावा. केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी दाबव टाकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
* कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध
कृषी विधेयक येण्यापूवीर्ही शेतक-यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे, मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
* मुलाखतीला राजकीय अर्थ नाही
खा. रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही. खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. राऊत यांची पाठराखण केली. राज्यातील सरकार स्थिर असून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असेही पवार यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
* सीबीआयने काय दिवे लावले ?
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे दिला मात्र इतक्या दिवसात त्यांनी काय दिवे लावले, असा सवाल आज शरद पवार यांनी केला आहे. मुंबई पोलीस याचा तपास करीत होती मात्र केंद्राला ते पसंत नव्हते म्हणून त्यांनी दुसऱ्या एजन्सीला काम दिले. पण या प्रकरणात आत्महत्येचा विषय बाजूलाच राहिला असून लक्ष वळवण्यासाठी इतरचं गोष्टीचा तपास सुरु केल्याने सत्य बाहेर येईल का हाच प्रश्न निर्माण झाला आहे, असे शरद पवार म्हणाले.