नवी दिल्ली : इंडियन अॅपच्या शोधात असाल तर आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. कारण शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप मित्रोटीव्हीने ‘आत्मनिर्भर अॅप्स’ लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये युजर्संना एकाच वेळी सर्व भारतीय अॅप्स मिळतील आणि आवश्यकेनुसार तुम्ही ते डाऊनलोडही करु शकाल. यात बिझनेस, ई-लर्निंग, न्यूज हेल्थ, शॉपिंग, गेम्स, इंटरटेनमेंट आणि सोशल यांसारखे अनेक अॅप्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
आत्मनिर्भर अॅप्स सध्या अॅनरॉईड युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे आणि हा गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, हा अॅप आयओएस प्लॅटफॉर्म वर हा उपलब्ध करण्यात येईल. यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अॅनरॉईड युजर्स अगदी सोयी आणि गरजेनुसार बेस्ट इंडियन अॅप्स डाऊनलोड करु शकतात.
आत्मनिर्भर अॅप्स मध्ये युजर्संना 100 हून अधिक अॅप्सची सुविधा मिळेल. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा दर्शवणाऱ्या अॅपमध्ये युजर्संना आत्मनिर्भर शपथ घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. हे अॅप डाऊनलोड करुन इंस्टॉल करुन तुम्ही वापरु शकता. त्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही.
हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यात अनेक कॅटेगरी दिसतील. यातून तुमच्या आवडीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. यात आरोग्य सेतु अॅप, भीम अॅप, नरेंद्र मोदी, JioTv, DigiLocker, लूडो किंग, कागज स्कॅनर, IRCTC रेल कनेक्ट, मॅप माय इंडिया मुव्ह आणि चिंगारी यांसारखे अनेक अॅप्स मिळतील. यात युजर्संना अॅपची साईज आणि कितीवेळा डाऊनलोड करण्यात आला आहे, ते देखील कळेल. आत्मनिर्भर अॅप्स मध्ये युजर्संना सर्व सोशल, इंटरटेनमेंट, लोकल, गेम्स, शॉपिंग, हेल्थ, न्यूज आणि बिजनेस अॅप्स एकाच वेळीच मिळतील. त्यासाठी तुम्हाला सर्वत्र शोधण्याची गरज नाही.