अक्कलकोट : केंद्र सरकारचे सुधारित कृषी विधेयक हे सामान्य शेतकर्यांच्या विरोधात असून हे विधेयक जो पर्यंत रद्द होणार नाही तो पर्यंत हा संघर्ष चालूच राहणार असल्याचे ठामपणे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आंदोलनादरम्यान सांगितले. आज काँग्रेसने चांगलेच शक्तिप्रदर्शन केले.
अक्कलकोट शहर व ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सोमवारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरात केंद्र सरकार व कृषी विधेयक विरोधात बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढला. सिद्धाराम म्हेत्रे यांनी तहसील कार्यालयास निवेदन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व कृषी विधेयक विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चा काढत शेवटी प्रमिला पार्क येथे समारोप झाला. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी नवीन कृषी विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी खरेदी करुन तो त्याच्या गोडवानला लावणार आहे. परंतु त्या व्यापाऱ्याने शेतकर्यांच्या मालाचे पैसे नाही दिले तर शेतकर्यांनी पोलीस तक्रार करता येणार नाही, शेतकर्यांना जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची, त्या नंतर जिल्हाधिकारी चौकशी समिती नेमणार, त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी साधारणतः पाच ते पंचवीस वर्षे लागतील. तेल बिया, गहू, तांदूळ, डाळी, कांदा, बटाटे या वस्तू अत्यावश्यक यादीतून वगळण्यात आले आहेत. नवीन विधेयकामुळे राज्य सरकारकडे शेतकर्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार ते काढून घेऊन ते स्वत:कडे ठेवले असल्याचा आरोप केला.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी, पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी, आनंदराव सोनकांबळे, धनेश आचलारे, विलासराव गव्हाणे, मंगल पाटील, सुनिता हडलगी, भीमाशंकर कापसे, बाबासाहेब पाटील, मुबारक कोरबू, सद्दाम शेरीकर, विकास मोरे, शिवानंद बिराजदार, दिलीप बिराजदार, अरुण जाधव आदींची उपस्थिती होती.