काबूल : अफगाणिस्तानच्या काबूल विद्यापीठात आज सोमवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला. तर 22 लोक जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
या हल्ल्यात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 22 पेक्षा जास्त व्यक्ती जखमी आहेत. सध्या सुरक्षादल आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु आहे. पोलिसांनी महाविद्यालयाला चारही बाजूंनी घेरलं होतं,
काबूल विद्यापीठात आज एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सुरु असताना अतिरेक्यांनी महाविद्यालयात शिरुन अंधाधुंद गोळीबार केला.
सुरक्षा रक्षकांसोबत जवळपास तासभर झालेल्या चकमकीनंतर या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काबूल विद्यापीठाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात अंधाधूंद गोळीबार केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला थांबवण्यात यश आलं असून गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे. हा हल्ला सरकारी अधिकारी काबूल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येण्याच्या वेळेस करण्यात आला.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्व विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. ज्यात 10 महिलांचा समावेश असल्याचं काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनांनी अफगाणिस्तानमध्ये अनेक शिक्षण संस्थांना टार्गेट केलं आहे. गेल्याच महिन्यात ट्युनिशिअन सेंटरच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता. याच संघटनेनं 2018 साली काबूल विद्यापीठावर हल्ला केला होता.
सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या व्हीडिओ फूटेजमध्ये काबूल विद्यापीठातील विद्यार्थी गोळीबार सुरू असताना पळताना पाहायला मिळत होते. काही विद्यार्थ्यांनी गोळीबारापासून बचाव करण्यासाठी भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. एका हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.