गोंदिया : विनोदी अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी त्यांना अटकही केली आहे. चित्रपटांत आपल्या अचूक टायमिंगमुळे विनोदी अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या विजय राज यांच्यावर अशा प्रकारे आरोप झाल्यामुळे आणि त्यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे येथे विजय राज यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ गोंदियातील हॉटेल गेटवे येथे मागील 15 दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुटींगदरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टाफमधील युवतीची छेड काढली, असा आरोप आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. अटक केल्यानंतर विजय राज यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने नेमका काय निर्णय दिला याबाबत माहिती समजू शकली नाही. परंतू, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या आधीही बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. तसेच काही महिला कलाकारांनी आणि अभिनेत्रींनी बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांवर मीटू अभियानांतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाचा मुद्दा चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राच नेमहीच चर्चेत असतो.