लखनौ : आंटी म्हटलं की कित्येक महिलांना राग येतो. मग ती महिला कितीही वयस्कर हा असेना आपल्याला आंटी म्हटलेलं कधीच कुणालाच आवडत नाही. काही महिला तर इतक्या संतप्त होतात की त्या काय करतील याचा नेम नाही, याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशमध्ये आला आहे. जिथं आंटी म्हटलं म्हणून महिलेची सटकली आणि भर बाजारातच एका महिलेनं दुसऱ्या महिलेची धुलाई केली.
उत्तर प्रदेशच्या एटामधील महिलांमध्ये झालेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका बाजारातील हा व्हिडीओ आहे. जिथं महिला करवाचौथच्या निमित्तानं शॉपिंगसाठी आल्या होत्या. बाजारात गर्दी होती. या गर्दीतच महिला एकमेकांना मारू लागल्या आणि याचं कारण म्हणजे आंटी हा शब्द. या शब्दामुळे महिला चांगल्याच भिडल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, बाबूगंज बाजारातील ही दृश्यं आहे. दोन महिला एका दुकानात उभ्या होत्या तिथं एकत्र खरेदी करत होत्या. त्यावेळी मागून काही महिला आल्या. त्यांनी दुकानात आधीपासूनच उभ्या असलेल्या या महिलांना बाजूला करण्यासाठी म्हणून आंटी असं संबोधलं आणि मग काय, याच शब्दानं ठिणगी पाडली.
ज्या महिलेला आंटी म्हटलं तिला जबरदस्त राग आला. ती भांडायलाच लागली. मग समोरची महिला कसलं ऐकून घेतंय तीदेखील भांडू लागली आणि मग पाहता पाहता महिलांच्या या दोन गटांमध्ये चांगलीच जुंपली. आधी बाचाबाची मग वाद आणि अखेर याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही गटातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारी झाली. दोन्ही हातांनी एकमेकांचे केस खेटले. एकमेकांना या महिला मारू लागल्या.
या घटनेची माहिती मिळतात महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलीस भांडण सोडवायला आले तरी महिला एकमेकांशी भिडतच राहिल्या. अखेर महिला पोलिसाने अथक प्रयत्न करून महिलांमधील भांडण मिटवलं.