मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना आपल्या निर्भिड वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकत असतात. त्यांनी एखादी प्रतिक्रिया दिली आणि त्यावर वाद झाला नाही असं होऊच शकत नाही. अलीकडेच कपिल शर्मा शो आणि अक्षय कुमारच्या सिनेमाविषयी त्यांनी केलेलं विधान लोक विसरले नसताना त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते महिला आणि पुरुषांना त्यांच्या कर्तव्यांबद्दल सांगत आहेत.
मुकेश खन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक भडकले असून महिलाही समाजमाध्यमावर टीका करु लागले आहेत. मुकेश यांच्या तोंडून अशा पद्धतीचं बोलणं ऐकून वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया येत आहे. तर काहींनी खन्ना यांची मानसिकता खूप वाईट असल्याचंही म्हटलं. अनेक यूझरने ‘शक्तीमान’ खऱ्या आयुष्यातला ‘किलविश’ निघाला असं म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणताना दिसतात की, ‘स्त्री- पुरुष हे वेगळे आहेत. स्त्रीची रचना वेगळी असते आणि पुरुषांची रचना वेगळी असते. घराची काळजी घेणं हे बाईचं काम आहे. पण जेव्हापासून महिला कामासाठी घराबाहेर पडायला लागल्या तेव्हापासूनच मीटू सारख्या समस्या सुरू झाल्या. आज तिला पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. पण या सगळ्यात ते लहान मुल त्रास सहन करतं ज्याला आईचा सहवास हवा असतो. मुलाला आयासोबत जबरदस्तीने राहायला भाग पाडलं जातं आणि तिच्यासोबत बसून ‘क्योंकी सांसभी कभी बहू थी’ सारखी मालिका पाहतो. एक पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्रीच राहते, असे म्हटले आहे.