वेळापूर : वेळापूर माइनर फाटा तालुका माळशिरस येथील घरकुलाचे बांधकाम झाले, याचा दाखला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या माळशिरस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे याला १८०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
तक्रारदार वेळापूर तालुका माळशिरस येथील ज्ञानदेव अर्जुन सोनवणे याने त्याची बहीण श्रीमती जयश्री धनाजी शिंदे (वय ६२ रा. मायनर फाटा वेळापूर ) तिला पंतप्रधान आवास योजना सन २०१८—१९ अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार ज्ञानदेव सोनवणे यांची बहीण जयश्री शिंदे हिने घरकुलाचे बांधकामही पूर्ण केले. सदर योजने अंतर्गत घरकुलाचा आलेल्या खर्चाचे शासकीय नियमानुसार अनुदान मिळते. सदर घरकुला करिता आतापर्यंत एकूणच ४ हप्ते मिळाले असून पाचवा हप्ता मिळण्याकरिता सदर घरकुलाची पाहणी करून दाखला देण्याची मागणी केली होती.
दाखला देण्यासाठी ज्ञानदेव सोनवणे यांना २ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. पैसे नाही दिल्यास व भेट देऊन बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देणार नाही, त्यामुळे तुम्हाला अनुदानाचा पाचवा हप्ता मिळणार नाही, असे अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लाचेची मागणी केल्यावर ज्ञानदेव सोनवणे यांनी लाचलुचपत विभागाकडे सोलापूर येथे तक्रार दाखल केली. यावरून पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी ज्ञानदेव सोनवणे यांना २ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५० मिनिटांनी मौजे सिदाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा तालुका माळशिरस येथील शाळेजवळ येऊन थांबायला सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानदेव सोनवणे हे दुपारी २.५० मिनिटांनी माळशिरस पासून अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर सिदाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळे जवळ येऊन थांबलो, त्यावेळेस पोलीस निरीक्षक कविता मुसळे हे त्यांच्या स्टाफ सह तेथे शासकीय वाहनाने आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक मुसळे यांनी सोनवणे यांना वाहनात बोलवून घेऊन त्यांची व तेथे उपलब्ध असलेल्या सोलापूर महानगरपालिका सोलापूर या कार्यालयातील शासकीय पंच धनंजय सोलनकर व शिवाजी नलावडे यांची ओळख करून दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मुसळे यांच्या सूचनेवरून दोन्ही पंचांनी ज्ञानदेव सोनवणे यांचे नाव आणि गाव विचारले असता ज्ञानदेव सोनवणे यांनी स्वतःचा पत्ता सांगितला त्यानंतर पंचांनी सोनवणे यांना तक्रार विचारली असता ज्ञानदेव सोनवणे यांनी त्यांना तक्रार सांगितली, त्यानंतर पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे यांना देण्यासाठी ज्ञानदेव सोनवणे यांना १८०० रुपये दिले. यामध्ये ५०० रुपयांच्या ३ नोटा व १०० रुपयांच्या ३ नोटा दिल्या त्या नोटांना एथ्रासीन पावडर लावण्यात आली. यानंतर पोलीस निरीक्षक मुसळे यांनी सापळ्याबाबत सर्व माहिती देऊन त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे यांच्या गटविकास अधिकारी कार्यालय माळशिरस येथे येऊन सापळा रचला.
ज्ञानदेव सोनवणे हे पंच नंबर एक सोलनकर यांच्यासमवेत सहाय्यक सुहास शिंदे यांची भेट घेतली आणि ज्ञानदेव सोनवणे यांनी आपल्या कामा बाबतची चर्चा करण्यास सुरुवात केली आणि आपले काम कधी होईल, असे विचारले असता सुहास शिंदे यांनी तुमचे काम आजच्या आज होईल, असे सांगितले. यानंतर ज्ञानदेव सोनवणे यांनी शर्टाच्या खिशातले १८०० रुपये काढून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुभाष शिंदे यांच्या समोर धरले असता ते पैसे घेऊन १८०० रुपये मोजून घेऊन त्यांच्यासमोरील टेबलाच्या खालील कीबोर्ड ठेवण्याच्या लाकडी पट्ट्या वरील कागदावर ठेवले व त्यानंतर लाच लुचपत च्या अधिकाऱ्यांना ज्ञानदेव सोनवणे यांनी इशारा करताच सापळा पथकाती. पोलीस निरीक्षक कविता मुसळे आणि पोलीस कर्मचारी यांनी सहाय्यक सुहास शिंदे याला १८०० रुपये लाच घेताना रंगेहात पकडले आणि लाचेची रक्कम जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ए सी पीपुणे संजय पाटील पोलीस उपअधीक्षक एसीबी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हेड काॅ. चंद्रकांत पवार, पोलीस नाईक अतुल घाडगे व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.