इंदूर : सेल्फी घेण्याच्या नादात एका महिलेला स्वत:चा जीव गमावावा लागला आहे, ही दुर्देवी घटना मध्य प्रदेशात घडली. मध्य प्रदेशात खरगोन जिल्ह्यातील कुटुंब जाम घाट येथे पर्यटनासाठी गेलं होतं, त्यावेळी सेल्फी घेताना महिलेचा तोल गेला अन् ती 800 फूट दरीत पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
सहा तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महू मंडलेश्वार घाट मार्गात ही घटना घडली, करवा चौथनंतर इंदूरमध्ये राहणारे विकास बाहेती हे पत्नी नीतू आणि मुलीसह खरगोनच्या जाम घाट फिरण्यासाठी आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी पती अन् मुलीसह सेल्फी घेणाऱ्या नीतू यांचा पाय कठड्यावरून घसरल्याने त्या 800 फूट दरीत खाली पडल्या. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंडलेश्वर पोलीस टीम घटनास्थळी पोहचली. महिलेचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यानंतर सहा तासांनी या महिलेचा मृतहेद घनदाट जंगलात सापडला. त्यानंतर महिलेचा मृतदेह वर आणण्यात आला. जाम घाट फिरून येत असताना घाट मार्गात हे कुटुंब थांबलं होतं, एकाठिकाणी नीतू सेल्फी घेण्याच्या नादात तिचा पाय घसरला, त्यानंतर ती दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला.
नीतू दरीत कोसळल्याने पती विकासला धक्का बसला, नीतूचा आवाज ऐकून घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. मंडलेश्वर ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष सिसोदिया म्हणाले की, प्रथमदर्शनी हा अपघात वाटत आहे, सेल्फीच्या वेळी महिलेचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळली, सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टम करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.