भंडारकवठे : विजयपूर – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील नांदणीजवळ औषध मारण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना ट्रॅक्टरला इंजिनचा जोडलेला पिन तुटल्यामुळे मागचा ट्राली पलटून एक जण जागीच ठार झाला. हा अपघात आज शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान झाला. महांतप्पा सिध्दप्पा हेळकर (वय ६७ रा. मंद्रूप) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
मृत महांतप्पा सिध्दप्पा हेळकर हे तुरीला औषध मारण्यासाठी नांदणीला हे MH 25 S 9733 या ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये बसून नांदणीकडे जात असताना अचानक ट्रेलरचा पिन तुटल्यामुळे मागची ट्रेलर रस्तावर उलटल्याने हेळकर हे रोड वर पडले. यात डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अपघाताची माहिती मिळताच हवालदार प्रमोद असादे , गोरखनाथ चौगुले घटनास्थळी पोहोचले. मुलगा दत्ता हेळकर यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन ट्रक्टर चालक परमेश्वर आडोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.