पंढरपूर : पंढरपूरकडे येणाऱ्या रिक्षाला मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार झाले तर ४ जण जखमी झाले आहेत. आज शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
एम १३ सीयु ५४७७ या क्रमांकाचा ट्रक पंढरपूरहून मोहोळकडे तर एम एच १३ एडी ८९३ क्रमांकाची रिक्षा पंढरपूरकडे निघाली होती. गोसावीवाडीजवळ समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यातील मयतापैकी एक जण आंबे (ता. पंढरपूर) येथील संदिप कोळी या युवकाचा समावेश आहे. इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे, हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे रिक्षामध्ये एकूण ७ जण प्रवास करीत होते. अपघातग्रस्त रिक्षातील सर्व प्रवासी एकमेकांच्या नात्यातील असल्याचे समजते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी एकाचे नाव संदीप कुमार कोळी (वय २४, रा. पंचमुखी मारुती मंदिरजवळ पंढरपूर), दुसरा सुजय विजय कांबळे (वय २३, रा. आंबे, ता.पंढरपूर) येथील असून एका मृताची ओळख पटलेली नाही. तर सुमित सुनिल झुंजार (वय २२, रा. नरखेड, ता. मोहोळ) हा जखमी झालेला आहे. अन्य तीन जखमींची नावे समजलेली नाहीत. रिक्षातील सातही जण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस करीत आहेत.