गोवा : न्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे अभिनेत्री पूनम पांडे आणि आता अभिनेता मिलिंद सोमणही अडचणीत सापडला आहे. एकिकडे पूनम पांडेला या प्रकरणात जामीन मिळाला आहे. तर दुसरीकडे आता मिलिंद सोमणविरोधात पोलिसात तक्राक दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील बीचवर न्यूड फोटोकाढून तो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गोवा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिलिंद सोमणनं आपल्या वाढदिवशी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. गोव्यातील एका बीचवर तो नग्नावस्थेत धावतानाचा हा फोटो. याबाबत गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अशा स्वैर वागण्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्याची बदनामी होत असल्याचं आरएसएसचे माजी सरसंघचालक आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमणलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. फिल्ममेकर अपूर्व असरानी याने देखील पोस्ट शेअर कर पूनम पांडेला पाठिंबा दर्शवतत ट्वीट केलं होतं.