पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आशीर्वाद घेत दत्तात्रय सावंत यांनी आज गुरुवारी अर्ज भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कोकण विभागाचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील त्यांच्यासमवेत होते.
आमदार सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे आशिर्वाद घेऊन पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सावंत यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी व शिवसेना अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे.
आमदार दत्तात्रय सावंत हे पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील असून २०१४ ला ही ते अपक्ष उभा राहून संघटनेच्या बळावर निवडून आले होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात आवाज उठवला होता. १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवार शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर होताच आ. सावंत यांचे कार्यकर्ते पाच ही जिल्ह्यात शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करीत आहेत.