मुंबई : वर्ल्ड कप टी-20 2021 या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. यावर आयसीसीनेे शिक्कामोर्तब केला आहे. भारताला यासारख्या मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. ही भारतासाठी सन्मानजनक बाब असल्याचं, बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली म्हणाला आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 दरम्यान ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती आयसीसीने दिली. तसेच गांगुलीने आपल्या ट्विटरवरुन या ट्रॉफीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
“टी 20 वर्ल्ड कप या सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला. या स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे आमच्यासाठी सन्मानजनक आहे. भारताला 1987 मध्ये 50 षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनपदाचा मान मिळाला होता. तेव्हापासून भारताने यशस्वीरित्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जगभर क्रिकेट खेळणारे आपले क्रिकेटपटू भारतात ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्साही आहेत”, असंही गांगुली म्हणाला. आयसीसीने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये गांगुलीने हे वक्तव्य केलं आहे.
“मी एक खेळाडू म्हणून आयसीसीच्या स्पर्धेचा एक भाग राहिलो आहे. तसेच मी याचा आनंदही घेतला आहे. या स्पर्धेचं आनंद घेणाऱ्या क्रिकेट रसिकांसाठी उत्तम वातावरणापेक्षा आणखी काहीच मोठं नाही. मी आता एक प्रशासकाच्या भूमिकेत आहे. मी प्रशासक म्हणून भूमिका बजावण्यासाठी उत्सूक आहे कारण मी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं यजमानपजद पार पाडण्यासाठी सज्ज आहे”, असंही गांगुलीने नमूद केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व जगात कोरोनाने थैमान घातलं होतं. यामुळे या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. 2021 मध्ये भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे 2022 सालच्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान ऑस्ट्रेलियाला देण्यात आला आहे.
भारताला टी 20 स्पर्धेंच यजमानपदाचा मान मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारताला 2016 मध्ये हा मान मिळाला होता. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडिने इंग्लंडवर मात केली होती.
या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अशा एकूण 16 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती.
“या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही सज्ज आहोत. ही स्पर्धा सुरक्षितरित्या होण्यासाठी तसेच सर्वांसाठी संस्मरणीय ठरेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”
जय शाह – सचिव, बीसीसीआय