उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावच्या येथील तारळी पूलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट ट्रॅव्हल्स बस पडून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दिवाळीची धामधूम सुरु असताना आशियाई महामार्गावर (उंब्रज ता.कराड ) येथील तारळी नदीच्या पुलावरुन मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मिनी बस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाच जण ठार झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळली. अपघातातील मृतांमध्ये एक महिला व तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. सदरचा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक व उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य सुरू होते. जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर वाशी वरून गोवा येथे निघाली होती.
यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला. त्यानंतर नागरिक पोलिसांनी येथे धाव घेवून मदत कार्य सुरू केले आहे.