मुंबई : लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. अशातच लोकांनी वीज वापरली असून त्याचे बिल भरावे. कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे. यामुळे सर्वसामान्यांना झटका बसणार आहे.
नितीन राऊत म्हणाले कि, वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचेही वीज कनेक्शन कट होणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तसेच योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी. मीटर पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात बिल सवलत याबाबत केंद्र सरकारने मदत करावी. पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले. वीज कंपनीने लॉकडाऊनमध्ये २४ तास वीजपुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यानच्या काळात स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिवाळीआधी वीज बिलात सवलत देण्याचे असे संकेत नितीन राऊत यांनी 2 नोव्हेंबर रोजी दिले होते. पण याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. शिवाय कॅबिनेट बैठकीत कोणता प्रस्ताव आला नाही. त्यात महावितरणने वीज बिल वसुलीचे आदेश काढले. त्यामुळे चर्चा सुरु झालो की वीज बिलात सवलत मिळणार आहे की नाही. पण आज अखेरीस ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीच विषय संपल्याचे सांगितले. एकूणच राज्य सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू टर्न घेतला आहे.
खरंतर कोरोना काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. कर्जाचे हफ्ते त्यात भरघोस आलेली वीज बिल यामुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष होता. परंतु आता कोणताही दिलासा मिळणार नसल्याने वीज बिलाचा भार ग्राहकांवरच पडणार आहे.