मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज शनिवारी सकाळी कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात तिच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे.
यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा नवरा हर्ष दोघांनाही कार्यालयात नेले. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने भारती आणि हर्ष यांच्या घरी छापा टाकला. आज सकाळी एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात अनेक ठिकाणी छापे टाकले.
मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेल्या एका ड्रग्ज पेडलरने भारती आणि हर्ष यांचं नाव सांगितलं. यानंतरच दोघांच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. भारती सिंग टीव्हीची पहिली लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. यापूर्वी अभिनेता आणि मॉडेल अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी दरम्यान एजन्सीने लॅपटॉप, मोबाइल फोन आणि टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची पत्नी यांनाही त्यांच्या जुहू येथील घरातून अटक केली होती.
गेल्या दोन आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.