मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने आज मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे. आजच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या ताब्यातील बीएमसीला जोरदार दणका बसला आहे. आता कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
महापालिकेने कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल. कंगनाच्या विनंतीचा विचार करण्यासाठी नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयीनंतर निर्णय दिला जाईल’, असा निर्णय न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आहे. तसंच, कंगनाच्या कार्यालयाविरोधात केलेली कारवाई मुद्दाम ठरवून केली आहे, चुकीच्या हेतूने केलेली आहे, असं मतही न्यायाधीशांनी नोंदवले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असं मतही न्यायाधिशांनी नोंदवलं आहे. त्यामुळे कंगनाला महापालिकेचा भरपाई द्यावी लागणार आहे. मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेना Vs कंगना असा वाद पेटला होता. या वादाला 9 सप्टेंबर रोजी नवीन वळण मिळाले. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाली हिल वांद्रे परिसरातील कार्यालयावर हातोडा चालवला होता.
देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले, असल्याचा ठपका पालिकेनं ठेवला होता. त्याचबरोबर, तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन, ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारण्यात आल्याचा दावाही पालिकेनं केला होता.
कंगनाने हे ऑफिस मनिकर्निका सिनेमाच्या आधी उभारले होते. पण, यात बरेच बांधकाम हे अधिकृत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी कंगनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी जेसीबी चालवून थेट कारवाई केली होती.